अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमीयत उलेमा-ए-हिंद आणि नवापूर येथील नागरिकांच्या नेतृत्वाखाली वक्फ (संशोधन) अधिनियम 2024 चा विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात समाजातील धार्मिक नेते, विद्वान आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि या विधेयकाच्या असंवैधानिक स्वरूपाविरोधात जोरदार आवाज उठवला.
वक्फ (संशोधन) अधिनियम 2024 हे मुस्लिम समाजाच्या धार्मिक अधिकारांवर थेट आघात आहे आणि हे भारतीय संविधानातील अनुच्छेद 25 व अनुच्छेद 26 चे उल्लंघन आहे, जे प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य आणि धार्मिक समुदायांना त्यांच्या धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार प्रदान करतात.
मुस्लिम समाज यावर ठाम आहे की हे विधेयक वक्फ मालमत्तांच्या पवित्रतेला धक्का पोहोचवते, जी धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी समर्पित आहे. या विधेयकाद्वारे धार्मिक अल्पसंख्याकांच्या घटनात्मक अधिकारांमध्ये हस्तक्षेप केला जात असून, देशाच्या सामाजिक व धार्मिक एकतेस धोका निर्माण होत आहे.
या निदर्शनादरम्यान, मुस्लिम नेत्यांनी इशारा दिला की सरकारने जर मुस्लिम समाजाच्या योग्य मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर हे आंदोलन आणखी तीव्र आणि आक्रमक पद्धतीने सुरू ठेवले जाईल. आम्ही संविधानाने दिलेल्या हक्कांचा वापर करून न्याय मिळेपर्यंत लढा देण्यास कटिबद्ध आहोत.