नवापूर परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला मीरा की नारी गौरव सन्मानाने भारावल्या..!!
नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती शीतलबेन वाणी यांच्या मातोश्री स्वर्गवासी मीरा काकी यांच्या उच्च ध्येय व तळागाळातील स्त्रियांच्या उद्धारासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या विचारांना चालना देण्यासाठी मीराकी नारी गौरव सन्मान कार्यक्रमाचे शाळेच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती शितलबेन वाणी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 8 मार्च 2025 रोजी श्रीमती एस एम चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी नवापूर येथे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख अतिथी, माजी महिला बालकल्यान सभापती सौ संगिता गावीत, वनक्षेञपाल स्नेहल अवसरमल,स्नेहलता शहा,संस्थेचे कार्यध्यक्ष शितलबेन वाणी,डॉ तेजल चोखावाला,शेपाली गांधी, रिना शहा, अनिताबेन अग्रवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ भारती बेलन, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सिमरन अमोल दिवटे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, भारत माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तदनंतर चलफीत साधनाचा वापर करून शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनीच शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीच्या अहवाल बघून मोठ्या उत्साहाने टाळ्या वाजवून प्रशंसा केली. तदनंतर कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हे नवापूर शहरातील विविध सरकारी तसेच निम सरकारी विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला त्यात त्यांना शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या नामवंत व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला ,जि प नंदुरबार फार्मसी ऑफिसर स्नेहल हिमांशू पाटील,नवापूरच्या पोस्ट ऑफिस च्या असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर श्रीमती सायली प्रभाकर महाजन, पीडब्ल्यूडी विभागाच्या असिस्टंट सिविल इंजिनियर श्रीमती पवार ज्योती संभाजी, वनक्षेत्र विभाग श्रीमती गावित कविता प्रभू मुन्सिपल कॉर्पोरेशन च्या समुदाय संघटक श्रीमती वलवी मीनाक्षी रूपसिंग, नवापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अंमलदार श्रीमती वसावा अलका जर्मनसिंग, नवापूर बस स्थानकाच्या कंडक्टर श्रीमती गावित रीता सिविल हॉस्पिटल नवापूरच्या सिस्टर इन्चार्ज श्रीमती गावित निर्मला मगन नवापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती दुर्गा राजेंद्र गावित, नवापूर पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रेखा चंदू पवार, नवापूर येथील महिला व्यवसायिक श्रीमती लताबाई कन्हैयालाल बेंद्रे,बँक एजंट श्रीमती मोहिनी रुपेश शहा.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांनी आपल्या वक्तव्यातून महिला दिवसाचे महत्व व स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल असे वक्तव्य करून सर्वांची वाहवा मिळवली. त्याचप्रमाणे श्रीमती दुर्गा गावित यांनी देखील आपल्या वक्तव्याने उपस्थित सर्वच प्रेक्षकांचे मन भारावून घेतले.त्यानंतर शाळेतल्या महिला शिक्षकांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत वाह वाह मिळवली कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या अध्यक्षिय भाषणात शाळेच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती शितल बेन वाणी यांनी आपला उत्कृष्ट संभाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेत व शाळेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व शाळेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत शाळेस सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून सर्वांचा आनंद द्विगुणित केला व शेवटी कार्यक्रमात उपस्थितंच्या मनोरंजनाचा भाग म्हणून गेम्स खेळण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका श्रीमती दविता मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचे काम श्रीमती रुबीना मॅडम व कुमारी मंजुषा मॅडम यांनी केले.कार्यक्रमाची रूपरेखा शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सिमरन अमोल दिवटे यांनी आखली होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.