कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर ,या ठिकाणी जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती नवापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते , प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षकांनी महिला दिन निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. श्री माळी सर यांनी महिला दिन निमित्ताने महिलांवर आधारित सुंदर अशी कविता सादर केली. किशोर रायते यांनी महिला दिन निमित्ताने , मार्मिक असे मनोगत व्यक्त करून विद्यार्थिनींना पुढील उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. आजच्या दिनाचे औचित्य म्हणून, विद्यालयातील सर्व महिला सहकारी यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चौधरी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जयस्वाल सर यांनी मानले