शालेय शिक्षण विभागाचा 14 मार्च 2024 संच मान्यता शासन निर्णय हा शिक्षकांच्या हिताच्या नसून तो हजारो शिक्षकांचे पद रद्द करण्याचे शासन निर्णय आहे. पटसंख्याचा अटीमुळे भरपूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे तरी अश्या शासन निर्णय रद्द करण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ सलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग)शाखा नवापूर यांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नवापूर यांच्यामार्फत ना.देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,ना. दादाजी भुसे शिक्षण मंत्री शालेय शिक्षण विभाग, ना. पंकज भोयर राज्यमंत्री शालेय शिक्षण विभाग* यांना प्रांत कार्यवाह अण्णासाहेब पुरुषोत्तम काळे यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले. अण्णासाहेब पुरुषोत्तम काळे यांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी दत्तात्रय जाधव नवापूर यांना आमच्या विद्यार्थ्यांवर शाळेवर व शिक्षकांवर होणारे अन्याय याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण केले. विदयार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान याबद्दल सविस्तर अशी चर्चा करून निवेदनाच्या त्वरित विचार करण्यात यावा नाहीतर विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने शिक्षकांचे आंदोलन उभे करण्यात येईल असे सूचित करण्यात आले. निवेदन देताना अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ सलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) प्रांत कार्यवाह अण्णासाहेब श्रीयुत.पुरुषोत्तम काळे जिल्हा कार्यकारणीतील सरिता साबळे, नितीन पाटील, योगेश महाले, तालुका कार्यकारिणीतील दिनेश चव्हाण, संदीप फुंदे,भाविन जगताप, सुनील वळवी,भरत सावळे,जितेंद्र गावित, योगराज भामरे नवापूर तालुक्यातील शिक्षक शरद गावित श्री.मनीष गावित,संदीप गावित,अविनाश गावित,आशिष गावित,जगदीश वसावे, वीरजी मावची,मनोज वळवी,आकाश कोकणी.संदीप राणा,शेख मुस्ताक उपस्थित होते अशी माहिती जिल्हाप्रसिद्धी प्रमुख योगेश ताराचंद महाले अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ सलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) जिल्हा शाखा नंदुरबार यांनी दिली आहे.