कोंडाईबारी घाटात पुन्हा पुन्हा अपघात- रात्री अपघाताचा थरार, दोन्ही ट्रकांचे समोरा समोर टक्कर- साहित्यासह मोठे नुकसान, तीन जण जखमी
येथे रोजच घडतात अपघात आणि आता पुन्हा अपघात घडला -ठोस उपाययोजना व सुचनाफलकांचा अभावामुळे होतोय अपघात.
कोंडाईबारी घाटातील अपघात थांबायला तयार नाही रोज अपघाताचे सत्र सुरूच असून कोंडाईबारी घाट हा अपघात घाट बनला आहे. महामार्ग होण्यापूर्वी येथे अपघात प्रमाण कमी होते मात्र महामार्ग झाल्यावर अपघात थांबायला तयार नाही. उपायोजना करण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे.कोंडाईबारी घाटात रात्री अपघाताचा थरार पाहायला मिळाला अक्षरशः दोन्ही ट्रकांचे साहित्यासह मोठे नुकसान झाले असून त्यात तीन जण जखमी झाले .महामार्गावर घाटात अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही... तोच पुन्हा अपघात घडतो.ठोस उपाययोजना व सुचनाफलकांचा अभाव या बाबी कारणीभूत ठरत आहेत. महामार्गावर अपघाताचे सत्र केव्हा थांबणार. हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटातील पोलीस चौकी जवळ दोन मालट्रक मध्ये अपघात झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील पोलीस मदत केंद्राजवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून नवापूरच्या दिशेने सनमाइका घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक आर जे 19 ए इ 7367) हा ट्रक महामार्गावर मार्गक्रमण करत असताना याच वेळी मका भरून येवला येथून अहमदाबाद कडे जाणारा ट्रक भरधाव वेगाने मागून येणारा ट्रक (क्रमांक जी जे 12 बी.व्ही. 3857) याचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक पुढे मार्गक्रमण असलेल्या ट्रकवर जाऊन आदळला व पुढे शेतात 40 - 50 फूट अंतरापर्यंत जाऊन विजेच्या खांबाला धडकला आहे .तर हैदराबादहून जोधपुर येथे जाणारा हा ट्रक रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटी झाला आहे. या अपघातात शेतातील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच विजेचे खांब व तार देखील तुटून नुकसान झाले आहे.या अपघातात आमिर खान रहीम पठाण 35, रमजान खान पुस्सलखान पठाण 20, बीकेखान उस्मान खान पठाण 23 सर्व रा . राजस्थान हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य नाणीज धाम महाराज संस्थान द्वारे मोफत सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी सर्व जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.