शहादा येथे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवमहापुराण कथेचे आयोजन समितीकडून करण्यात येणार असून यासाठी प्रसिद्ध कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची आज आयोजन समितीने भेट घेऊन कथेचे आयोजन व कथेसाठी दिनांक निश्चित व्हावी यासाठी भेट घेऊन चर्चा केली. पंडित श्री.मिश्रा यांनी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कथेची तारीख निश्चित करण्याचे आश्वासन दिले असून कथेची तयारी करण्यासाठी काही दिवसातच समितीकडून नियोजनाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
यासाठी शहादा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवमहापुराण कथा समितीचे सदस्य यांनी सिहोर मध्य प्रदेश येथे प्रसिद्ध कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची भेट घेऊन शिवमहापुराण कथेच्या नियोजनाची चर्चा केली.
सिहोर मध्य प्रदेश येथे शहादा विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य मकरंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्याम जाधव, प्रसिद्ध व्यावसायिक अजय गोयल, तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शशिकांत वाणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोतीलाल जैन, , महावीर पतसंस्थेचे संचालक समीर जैन, ज्येष्ठ पत्रकार ईश्वर पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक विनोद पाटील, सुनील पाटील, तळोद्याचे माजी नगरसेवक गौरव वाणी आदी उपस्थित होते...... शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे