बापरे चक्क इंजिनिअरची कार चोरी करण्याच्या चोरट्यांच्या धाडसी प्रयत्न... परिसरात एकच खळबळ.. कार चालू झालीच नाही त्यामुळे चोरटे ठरले सपशेल अपयशी..!
नवापूर प्रतिनिधी
विसरवाडी येथे चक्क इंजिनियर ची कार चोरी करण्याच्या धाडसी प्रयत्न चोरट्यांनी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.विसरवाडी येथे इंजिनीयर महेश अग्रवाल यांची कार चोरून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न झाला कारच्या काच फोडून हँडल तोडून आत प्रवेश केला.मात्र कार चालू झाले नाही त्यामुळे प्रयत्न फसला.विसरवाडी येथील इंजिनियर महेश मालूराम अग्रवाल यांचे विसरवाडी येथे त्यांच्या घराच्या बाजूलाच त्यांनी त्यांची कार (क्रमांक एम एच 39 जे 99 10) ही उभी केलेली होती मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कारचे काच फोडून तसेच हँडल तोडून कार मध्ये प्रवेश केला कार मधील टूलबॉक्स देखील फोडून नुकसान केले . कार चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र कार सुरू झाली नाही त्यामुळे चोरट्यांचा कार चोरण्याचा प्रयत्न मात्र फसला.
त्यामुळे चोरटे कार सोडून त्यांच्या जवळील कार मध्ये बसून पसार झाले. सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे एका कार मध्ये आल्याचे दिसत आहे. सकाळी नेहमी प्रमाणे उठल्यावर महेश अग्रवाल त्यांची कार चे नुकसान केल्याची दिसून आले