नवापूर तालुक्यात विसरवाडी येथे खाटू श्याम बाबाचे फागुन उत्सवानिमित् संकीर्तन व निशाणी यात्रा संपन्न झाली.
प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यात फागुन महोत्सव साजरा केला जातो या निमित्ताने येथे किर्तन, दिव्यज्योत व महाप्रसादाचे आयोजन केले जाते मोठ्या भक्ती भावाने शाम प्रेमी कीर्तनासाठी हजेरी लावतात.
दिनांक 16 मार्च रोजी रविवारी संध्याकाळी येथील शिवमंदिरापासून निशान यात्रा प्रारंभ करण्यात आली ढोल ताशाच्या गजरात मोठ्या भक्ती भावाने ही निशाणी यात्रा कीर्तन स्थळापर्यंत काढण्यात आली रात्री सात वाजेपासून कीर्तनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी कीर्तनासाठी राजस्थान येथील प्रसिद्ध गायक संतोष व्यास (रिंगस राजस्थान), दिपाली यादव (भोपाल) यांनी सुमधुर वाणीत कीर्तन करून श्याम भक्तांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी फागुन महोत्सव असल्याने रंगांची होळी खेळण्यात आली. बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी या रंगोत्सवाचा आनंद घेतला.सहावे संकिर्तन कार्यक्रमाचे आयोजन विसरवाडी येथील शिव भजनी मंडळ तसेच श्याम प्रेमी परिवारा तर्फे करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भाविकांनी परिश्रम घेतले.
यावेळी कीर्तनासह महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते संपूर्ण भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.