नवापूर शहरातील वनिता विद्यालय व आदर्श प्राथमिक शाळा येथील शिक्षण घेणाऱ्या दोघा बहिण भावाने महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिक्षा (एम टी एस) परिक्षेत महाराष्ट्र राज्यात गुणवत्ता यादीत स्थान मिळविले तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवुन नवापूर तालुक्याचा मान उंचावला आहे.
नवापूर शहरातील मंगलदास पार्क येथील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य बाल रोग तज्ञ डॉ चंद्रशेखर शिवाजी पाटील व डॉ. सौ. स्नेहा चंद्रशेखर पाटील यांच्या दोन्ही मुलांनी चक्क मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण मिळवित नवापूर तालुक्याचे नाव लौकिक केले.
यावेळी वनिता विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विद्युलता नांद्रे मॅडम ह्या कु. नक्षत्रा चंद्रशेखर पाटील व राधेय चंद्रशेखर पाटील यांच्या आजी आहेत.
नवापूर शहरातील मार्च एज्युकेशन संस्था संचलित वनिता विद्यालयातील इयत्ता ७ वी वर्गातील कु. नक्षत्रा चंद्रशेखर पाटील हीने महाराष्ट्र राज्यात गुणवत्ता यादीत स्थान मिळवुन तेविसाव्या क्रमांक मिळविला तर नंदुरबार जिल्ह्य़ात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी वर्गातील चि. राधेय चंद्रशेखर पाटील यांने महाराष्ट्र राज्यात गुणवत्ता यादीत एकविसावे स्थान मिळविले आहे तर नंदुरबार जिल्ह्य़ात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
महाराष्ट्र टॉलेन्ट सर्च (एम टी एस) परिक्षेत कु. नक्षत्रा व चि. राधेय या दोन्ही भावंडांच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे
यावेळी गुणवंत दोन्ही भावंडांचा तसेच डॉ. पाटील परिवाराचा मार्च एज्युकेशन संस्थेच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष अनिल सुदाम पाटील व संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे गौरविण्यात आले.