अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा.. वर्षा माळी
आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आणि विज्ञान विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ संजय अहिरे ,प्रमुख व्याख्याते वर्षा माळी, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्रा जगदीश काळे,प्रा डॉ किशोर सोनवणे डॉ मंदा मोरे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. गौरी पाटील, प्रा फिलिप गावित हे होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व सर्व मान्यवरांनी सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्याअर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वर्षा माळी यांनी बोलताना अंधश्रद्धेला दूर करून विज्ञानाचा आधार घेऊन प्रत्येकाचा विकास साधता येईल म्हणून असा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकामध्ये रुजवणे गरजेचे असल्याचे सांगितले, या प्रसंगी नंदनी ठाकरे यांनी सी व्हि.रमण यांच्या संदर्भात माहिती सांगितली. याप्रसंगी डॉ. गौरी पाटील यांनी देखील विज्ञान हे दुधारी तलवार असल्याने आपल्याला योग्य त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले,अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ संजय अहिरे यांनी दैनंदिन जीवनात थेरॉटिकल माहिती जमा न करता प्रॅक्टिकल माहिती वर भर द्यावा असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल वसावे आणि अंकिता वळवी,प्रास्ताविक प्रीती गावित तर आभार ज्योती वसावा यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी,आजेश भवरे,नीतीक्षा गावित, नंदिनी ठाकरे, तनिषा वळवी, शारदा वळवी,दीपक पवार, आशिष वसावे, मेघा पेडामकर तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले यांनी प्रयत्न केले.