विज्ञान दिवस उत्साहात साजरा
दी नवापूर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित श्रीमती एस. एम. चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी नवापूर येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी विज्ञान दिवस शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सिमरन अमोल दिवटे यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेने मोठ्या उत्साहात साजरा केला. विज्ञान दिवस साजरा करण्याची तयारी गेल्या आठवड्याभरापासून सुरू झाली होती. सर्वप्रथम मुख्याध्यापिका यांनी शिक्षकांची बैठक घेऊन विज्ञान दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावण्याच्या सूचना दिल्यात तसेच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची रुची निर्माण व्हावी व त्यांना कृतीयुक्त शिक्षण मिळावे यासाठी विविध विज्ञान वर आधारित प्रोजेक्ट करण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
मुख्याध्यापिकांच्या सूचनेने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी विविध प्रोजेक्ट जसे हायड्रोलिक पंप, व्हक्युम क्लिनर,इलेक्ट्रिक हायवे, बलून पावर कार, इलेक्ट्रिक कार मॅग्नेटिक कार,सिम्पल मशीन विंडमिल असे विविध चलित प्रोजेक्ट शाळेत बनवून सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले.
तदनंतर सर सी व्ही रामन यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांना ओळख करून देत त्यांच्या प्रतिमेस शाळेच्या मा. मुख्याध्यापिका डॉ. सिमरन अमोल दिवटे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच आज भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची पुण्यतिथी असल्यामुळे मुख्याध्यापिका यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
शाळेचे अध्यक्ष श्री विपिनभाई चोखावाला, कार्यकारी अध्यक्षा श्रीमती शितल बेन वाणी, मा. उपाध्यक्ष शिरीष भाई शाह, सचिव राजेंद्र भाई अग्रवाल, सहसचिव हाजी शोएबभाई मांदा, कोषाध्यक्ष श्री सतीशभाई शहा तसेच इतर सर्व माननीय सदस्य मंडळांनी मुख्याध्यापिका यांच्या कल्पकतेचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्यात.
शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला.