नवापूर येथील तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा
ग्राहकांनी त्यांच्या हक्कांची जाणीव ठेवून योग्य प्रकारे न्याय मिळवावा-तहसीलदार दत्तात्रय जाधव.
श्रम मजूर व दिव्यांगांना रेशन कार्ड व श्रम कार्ड वाटप...!
नवापूर- येथील तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार यांनी दिलेल्या सूचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दत्तात्रय जाधव उपस्थित होते. तर कार्यक्रमाला गटविकास अधिकारी देविदास देवरे,नायब तहसीलदार सुरेखा जगताप, जिल्हा ग्राहक समितीचे सदस्य मंगेश येवले, नवापूर तालुका अध्यक्ष सुधीर निकम, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जालमसिंग गावित, संघटनेचे सचिव महेंद्र चव्हाण उपस्थित होते. प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी मंगेश येवले, विजय बागुल, मनोज बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती देण्यात आली.ग्राहक संरक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन केले. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण, फसवणुकीपासून बचाव, तसेच जबाबदार ग्राहक होण्यासाठी आवश्यक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत दिव्यांगांना व श्रम मजूर यांना योजनेची रेशन कार्ड व श्रम कार्ड वाटप करण्यात आले
तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी यांनी "ग्राहकांनी त्यांच्या हक्कांची जाणीव ठेवून योग्य प्रकारे न्याय मिळवावा. प्रशासन त्यासाठी सतत कार्यरत असल्याचे सांगितले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अधिकारी सुरेखा जगताप, दिलीप पाडवी, प्रताप मराठे,सुनीता खिल्लारे व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर निकम तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत पाटील यांनी केले
यांना वाटप करण्यात आले श्रम कार्ड व रेशन कार्ड---
जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त तहसील कार्यालयात शासनाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत दिव्यांगांना व श्रम मजूर यांना योजनेचे रेशन कार्ड व श्रम कार्ड वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यात-अंकुश विरसिंग वसावे, विलास जयसिंग वसावे, धवळ्या धर्मा कोकणी, नशीब तारू कोकणी, ज्योती दिनकर पाडवी यांच्या समावेश आहे.