नवापूर -तालुक्यातील टीम ट्रस्ट खा.प्रा.शाळेत खेकडा केंद्रातर्गत टीम ट्रस्ट झामणझर व जिल्हा परिषद खोकरवाडा याच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद घेण्यात आली.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून झामणझर गावाचे सरपंच पौलस सायत्या कुवर तसेच प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी किशोर रायते, ग्रामपंचायत सदस्य दानियल मावची ,केंद्रप्रमुख रामू कोकणी,
केंद्रमुख्याध्यापक श्री.जाधव,लक्कडकोट शाळेच्या मुख्याध्यापिका जया नेरे ,आमपाडा शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी मावळी थुवा शाळेचे मुख्याध्यापक गोपाल मावळी हे होते.
सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ईशस्तवनाने देवाची आराधना करून सर्व मान्यवरांना व शिक्षक बंधू भगिनींना शाळेच्या वतीने स्नेहवस्त्र व लेखनी देऊन सन्मानित करण्यात आले.मागील शिक्षण परिषदेचा आढावा केंद्रप्रमुख रामू कोकणी यांनी घेतला.त्यानंतर शिक्षण परिषदेचे मह्त्वाचे विषय घेण्यात आले. त्यात शिक्षणविस्तार अधिकारी किशोर रायते यांनी निपुण महाराष्ट्र अभियान क्रुती कार्यक्रम(05मार्च2025) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.केंद्रमुख्याध्यापक श्री जाधव यांनी शाळा गुणवत्ता व मूल्यांकन व आश्वासन आराखडा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. या चर्चेत सर्व शिक्षकांनी आपल्या शंकेचे निरसन करून घेतले.मन्मथ पाटील यांनी परिपत्रक वाचन व मार्गदर्शन केले. जया नेरे यांनी निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम या विषयावर गटकार्य करून घेतले. सारिका तांबोळी यांनी गटकार्याचे सादरीकरण केले.शालेय पोषण आहाराबाबत गोपाल मावळी यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर चविष्ट भोजनाचा आस्वाद सर्व मान्यवरांना व शिक्षक वृद्धांना देण्यात आला.आजच्या शिक्षण परिषदेचे आकर्षण ठरले ते म्हणजे सेल्फी स्टॅन्ड, सर्व शिक्षकांनी सेल्फी काढण्याचा मनमुराद आनंद घेतला. सूत्रसंचालन रावसाहेब सावळे यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली गवळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी रावसाहेब पाटील भारती वडनेरे, प्रतिमा मॅडम यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक प्रवीण राजभोज व छगन वळवी यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.