चलो बुलावा आया है माता ने बुलाया है असा जयघोष करत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक देवमोगरा मातेच्या दर्शनाला
March 26, 2025
0
चलो बुलावा आया है माता ने बुलाया हे असा जयघोष करत गुजराथ राज्यातील सागबारा येथील देवमोगरा मातेचा दर्शन माजी जि प अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी घेतले.माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक या दरवर्षी आपली कुलदैवत आई देव मोगरा मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी जात असतात. याही वर्षी त्यांनी देव मोगरा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माजी नगराध्यक्ष दामूआण्णा बि-हाडे,उमराण ग्रामविकास संस्था सचिव दिपक वसावे,डॉ नचिकेत नाईक,करिशमा नाईक,दिलीप पवार,पराग नाईक,तुशार गावीत आदी उपस्थित होते.दर वर्षी नाईक कुटुंबीय आई देवमोगरा माताचे दर्शनासाठी जात असतात.नवापूर तालुक्यात भरपुर पाऊस पडू दे आणि सर्वाचे आरोग्य चांगले राहू दे.नविन वर्ष सर्वांना सुखी आणि समाधानाचे जाओ अशी प्रार्थना नाईक कुंटुबियांनी यावेळी देव मोगरा मातेसमोर केली.गुजराथ राज्यातील आई देवमेगरा माता दर्शनासाठी भाविक मोठया संख्यने येत असतात गुजराथ,महाराष्ट्र,मध्य प्रदेश,राजस्थान या राज्यातुन असंख्य भाविक भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे