Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

नवापूर शहरात सरदार चौक येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव कार्यालयाचे उद्घाटन..

नवापूर शहरात सरदार चौक येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव कार्यालयाचे उद्घाटन..

नीतूबेन सुनील शर्मा या महिला रामभक्ताकडे यावर्षी अध्यक्षपद


  नवापूर शहरात  सालाबाद प्रमाणे यंदाही श्री राम जन्मोत्सव समिती तर्फे श्री राम नवमी निमित्ताने राम जन्मोत्सव 6 एप्रिल रोजी साजरा होणार असून समीतीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
     यावेळी नीतूबेन सुनील शर्मा या महिला रामभक्ता कडे यावर्षी अध्यक्षपदाची सूत्रे दिली असून समीती तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने सरदार चौक येथे श्री राम जन्मोत्सव 2025 कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन शहरातील प्रसिद्ध उद्योजक व सी.ए. नरेंद्र अग्रवाल यांच्या हस्ते झाले.
    यावेळी भरत‌ गावीत, मनोज अग्रवाल, हेमलता पाटील, प्रकाश पाटील, रामकृष्ण पाटील,हरिष पाटील,चुनीलाल पाटील, राकेश राणा,दिपक वसावे,अजय वसावे ,जतनसिंग वसावे,सुधीर निकम आदि उपस्थित होते.
     कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री राम,लक्ष्मण,सीता व हनुमान या रामचंद्र बारच्या मुर्तीचे विधिवत पूजन पुजारी शार्दुल पाठक यांनी मंत्रोपच्चाराने उपस्थित मान्यवरांचा हस्ते जय श्रीरामाचा जयघोषात केली.
    यावेळी सी.ए.नरेंद्र अग्रवाल यांनी सांगितले की श्रीराम हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत असून शिक्षण विभागाने श्रीराम हा विषय आपल्या अभ्यासक्रमात ठेवून श्रीरामाची महती विद्यार्थ्यांना समजेल तसेच महाविद्यालयीन शिक्षणात देखील कला, वाणिज्य व विज्ञान विभागात देखील श्रीरामा वर विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा असे मत व्यक्त केले. यावेळी भरत गावित हेमलता पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमात सहभागी होऊन हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन किरण टिभे यांनी तर आभार नीतूबेन शर्मा यांनी मानले या वेळी समीतीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील श्रीराम भक्त व मातृ शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.