नवापूर शहर हे धूळयुक्त शहर म्हणून ओळखले जाऊ लागले असून शहरातील विविध भागात धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील विविध भागात असलेल्या धुळीजन्य रस्त्यांमुळे नवापूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नवापूर नगरपालिकेला प्रशासक लागुन २ वर्षाचा कार्यकाळ झाला असुन नवापूर शहरात रस्त्याची अंत्यत गंभीर दुरावस्था झाली आहे.यावर नवापूर नगरपालिका प्रशासक केव्हा लक्ष देईल असा प्रश्न नवापूर शहरातील नागरीक करीत आहे. शहरातील खाकरफळी भागातील रस्ता,शासकीय विश्रामगृह जवळील पुल,शितल सोसायटी,शिवाजी रोड,गुजरगल्ली,याभागातील रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था आहे.रस्त्याची जागा जागोजागी खड्ड्यांनी घेतली आहे व त्यात माती पसरली असून यामुळे शहरात धुळ उडवत आहे.याकडे नवापूर नगरपालिका प्रशासन केव्हा लक्ष देईल असा प्रश्न नवापूर शहरातील नागरीक करीत आहे.शहरात पावसानंतर रस्त्यावर खडे बुजण्याचे काम सुरु केले होते माञ थातुर मातुर रस्त्याचे खडे बुजऊन रस्त्याची परत जैसे थे अवस्था झाली आहे.धुळीमुळे नागरीकाचे आरोग्य धोकयात आले आहे. सर्दी खोकला दमा या आजाराने डोके वर काढले आहे. नगरपालिका प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील धूळ साफ करून नवापूर शहर धुळमुक्त करावे अशी मागणी अनेकांनी केली आहे