नवापूर शहर व परिसरात अपघाताचे सत्र थांबायला तयार नाही. महामार्ग झाल्यापासून अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
नवापूर शहरातील नया होंडा परिसरात आज सकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास मोठा अपघात घडला. धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव येथून राजस्थानकडे कापड घेऊन जाणाऱ्या ट्रक (क्रमांक आर.जे ०४ जी बी ६०३१) ला समोरून येणाऱ्या वाहनाने साईड न दिल्याने ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गावर पलटी झाला.
या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली असून, अजून सदर ट्रक हलवण्यात आलेला दिसून आला नाही.वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना केल्या नसल्याचे दिसून येते आहे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून मार्गक्रमण करावे लागत आहे.