रणरणत्या उन्हात होतेय तृष्णातृप्ती, ठिकठिकाणी पाणपोई--पारंपारिक माठाची जागा घेतली थंड पाण्याच्या जारने..!
नवापूर प्रतिनिधी--
उन्हाची तीव्रता वाढली असून आता शरिराला नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासू लागली आहे. कामानिमित्त रणरणत्या उन्हात बाहेर पडलेल्या तहानलेल्या जीवांना पाणपोईचा गारवा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणपोयी सुरु झाल्या पाहिजे.आता उन्हाळा लागल्याने या पाणपोई सुरु करण्याची आवश्यकता आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर व लिमडावाडी परिसरात नवापुर तालुक्यातील अनेक ग्रामस्थ येत असतात. त्यांना पाणी पिण्यासाठी कुठेही जाऊन पाणी मागावी लागते ही गरज लक्षात घेता नवापूर येथील सेवाभावी युवक मंडळ यांनी एकत्र येऊन पाणपोई सारखा स्तुत्य उपक्रम गेल्या काही वर्षापासून सुरू केला आहे. त्या अनुषंगाने याही वर्षी स्वर्गीय मातादीनजी बनवारीलाल जी शर्मा यांच्या स्मरणार्थ नवापूर शहरातील लिमडावाडी येथील शांती हॉटेल समोर मोफत पानपोई सेवेचे उद्घाटन तुलसीराम शर्मा,जयंतीभाई अग्रवाल,फकीरभाई अग्रवाल,रुडमल शर्मा यांच्या हस्ते विद्यवत पुजन करुन करण्यात आले.या मोफत पाणी पोई राजस्थान नवयुवक मंडळ २० वर्षा पासुन हा उपक्रम राबवित असतात. शहरातील लिंमडावाडी परीसरात रिक्षा स्टॉप असुन या भागात ग्रामीण भागातील ग्रामस्थ येत असतात उन्हाळ्यात त्यांना थंड पाणी मिळावे या उदेशाने या ठिकाणी मोफत पाणी पोळीचे आयोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयभाई सैन,माजी नगरसेविका मंगला विजय सैन,मामराज शर्मा, शंकर सैन,विजय सैन,राजेश तिवारी,पवन शर्मा,सोनु दर्जी,शंकर दर्जी,गोपी सैन,जगदीश सैन,अंकीत सैन,हेमंत शर्मा,चंद्रेस अग्रवाल,धुर्वेश अग्रवाल,सुनिल शर्मा,सप्नील सैन,मनोज प्रजापत करीत असतात,आशिष तिवारी,लालाभाई चव्हाण करीत असतात.