भव्य दिव्य सोहळ्यात पुणे येथील ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधले...!!
प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाची महाआरती नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदान येथे आज रविवारी सायंकाळी १००१ दांपत्यांच्या हस्ते संपन्न झाली. या भव्य दिव्य सोहळ्याला माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावित माजी आमदार शिरीष चौधरी युवा नेते डॉ विक्रांत मोरे अनुलोम महाराष्ट्र राज्य प्रमुख स्वानंद जी ओक भागवत कथाकार अविनाशजी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर भागवताचार्य रवींद्र पाठक महाराज गणेश जोशी महाराज चंद्रकांत रोडे महाराज दशरथ महाराज गुमानसिंग महाराज जानेमहाराज दवे महाराज गिरीश महाराज संतोष महाराज कौशल्य माताजी रेवता महाराज माधव शामसुंदर महाराज ईश्वर महाराज योगिता दीदी देवेंद्र पांढरकर यांच्यासह साधुसंत महंतांची उपस्थिती होती. या भव्य दिव्य सोहळ्यात पुणे येथील ढोल पथकाने उपस्थित त्यांचे लक्ष वेधले होते. प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे स्नान करण्याचा ज्या भाविकांना योग आला नाही अशा सर्व भाविकांसाठी शिरीष दादा मित्रपरिवार डॉ विक्रांत मोरे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून जलतीर्थ वितरणाच आयोजन देखील करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील एक लाखाहून अधिक भाविकांना या पवित्र गंगाजलचा वाटप सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.