नवापूर शहरात उदंड झाले शॉपिंग गाळे-मात्र पार्किंग झोन कुठेच नाही--वाहतूक कोंडीने नवापूरकर हैराण-बेशिस्त पार्किंगने नागरिक हैराण..
नवापूर शहरातील नगर परिषद हद्दीतील असलेल्या काही भागांमध्ये अनेकांनी लहान मोठ्या प्रमाणात शॉपिंग गाळे काढून भाड्याने दिले आहे. मात्र शॉपिंग गाळे तयार करत असताना पार्किंग झोन केले नसल्यामुळे वाहन बेशिस्त प्रकारे रस्त्यावर पॉकिग केले जाते. वेळोवेळी या भागात ट्रॅफिक जाम होत असतो. काही वर्षापासून नागरिकांनी शॉपीग गाळे बांधणे सुरू केले आहे मात्र त्यातही गाळेपेक्षा संपुर्ण दुकान भर रस्त्यावर लावली आहे. यामुळे या परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहतूक कोंडीची गंभीर समस्या दिवसेन दिवस अति गंभीर होत असताना नवापूर नगर परिषद बेशिस्त पॉकिगवर उपाय योजना करण्यास तयार नाही. शहरातील ठिकठिकाणी व्यापारी संकुलाबरोबरच इमारतीमधील पार्किंगची व्यवस्था आजही कागदावरच आहे. वर्षानुवर्षापासून वाहनांची मोठी गर्दी होत असताना पार्किंगचाही प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. नगर परिषद समोर देखील मोठ्याप्रमाणात बेशिस्त पार्किंग होत असते. शॉपिंग गाळ्यात पार्किंगची व्यवस्थाच माहीत नाही का मोठा प्रश्न आहे.शहरातील बसस्टॅड, लाईट बाजार, लिमडावाडी, मच्छी बाजार, कुंभारवाडा, कॉलेज रोड, व देवळफळी, नई होन्डा या भागात कायमच वाहन रस्त्यावर पॉकिग केली जाते. मात्र यावर कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. कोणीतीही दंडात्मक कारवाई काही ठिकाणी वगळता दुसरीकडे होताना दिसत नाही असे नागरिकांकडुन सांगितले जात आहे. यामुळे वाहतूक कोंडी व बेशिस्त पॉर्किंग वर कारवाई होणार कधी असा प्रश्न नागरिक करीत आहे. (स्पेशल रिपोर्ट)