घरकुल अनुदानासाठी अधिकारी,
कर्मचाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करु नये--
नवापूर पं.स.च्या गटविकास अधिकाऱ्यांचे आवाहन
प्रधानमंत्री, शबरी, रमाई व मोदी आवास योजनेच्या अनुदान घरकुलांच्या देण्यासाठी कोणत्याही प्रकारची रक्कम द्यावी लागत नाही. म्हणून घरकुल व ग्रामीण रोजगार हमीच्या कामांसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करु नये,असे आवाहन नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी केले आहे.याबाबत नवापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना पत्र जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रधानमंत्री, शबरी, रमाई, मोदी आवास योजनेच्या घरकुल कामासाठी दिला जाणारा पहिला, दुसरा, तिसरा व अंतीम अनुदानाचा हप्ता देण्यासाठी कोणतीही रक्कम लागत नाही. घरकुलांचे फोटो काढतांना ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांना घरकुलासाठी १२५० रुपये प्रति घरकुल शासनाकडून मोबदला मिळतो. म्हणून ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांसह पंचायत समितीच्या घरकुल विभागातील अधिकारी, कर्मचारी व डाटाएंट्री ऑपरेटर यांच्याही कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करु नये. घरकुलांचे अनुदान वितरीत करण्यासाठी कुठलीही रक्कम देण्यात येवू नये. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुल व इतर कामांचे रजिस्टर काढतांना कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करु नये. नवापूर तालुक्यातील लाभार्थ्यांनी याबाबत काळजी घ्यावी. कुणीही आर्थिक व्यवहाराची मागणी केल्यास
वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करावी, असे आवाहन नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करावी, असे आवाहन नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एम. देवरे यांनी केले आहे.