नवापूर प्रतिनिधी-
नवापूर बस स्थानकावरील एसटी बस अचानक सुरू होऊन दुकानावर आदळली त्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी ठरली. मोठा अनर्थ टळला आहे.
नवापूर बसस्थानक परिसरात नेहमी प्रमाणे १२ ते १२:३० चा दरम्यान नवापूर- भोमदीपाडा M.H 14. B T 2114 ही बस उभी होती त्या बस मध्ये विद्यार्थी बसले होते उभी बस अचानक सुरू होऊन ती थेट बस स्थानका समोर असलेल्या ए वन पान दुकान व पाणी बॉटल दुकानात घुसून दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.यात दुकान मालक एकनाथ मोरे हे किरकोळ जखमी झाले आहे तर दुकान मालक माज अजिम पठान, स्टीलिना गणेश गावित वय 8 वर्ष रा रायगंण आदर्श प्राथमिक विद्यालय येथील 2 री वर्गात शिकणारी मुलगी आहे. तर सोनाली अनिल गावित वय 13 वर्ष राहणार रायगणं सार्वजनिक हायस्कूल येथे 6वी ला शिकत आहे.या मुली अपघातात जखमी झाल्या आहेत. दोघा जखमी मुलींवर उपचार सुरू आहे. एसटी बस नवापूर येथून करंजी भोमदीपाडा 12:30 ला सुटणार होती. बेकाबु बसला खाजगी वाहणाचा चालक रोहिदास खैरणार,बसस्थानक परिसरातील ट्राफिक पोलीस विकी वाघ,जितेंद्र कोकणी यांनी आपली जिवाची परवा न करता बसमध्ये चढुन बसचा ब्रेक दाबून बस थांबवली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. घटनास्थळी लोकांनी एक गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,उपनिरीक्षक विशाल सोनवणे,आगार प्रमुख विजय पाटील यांनी बस स्थानक येथे जाऊन पहाणी केली.बस मध्ये बसलेले विद्यार्थी अंत्यत भयभीत झाले होते.या प्रसंगी रोहीदास खैरणार,पोलिस विकी वाघ,जितेंद्र कोकणी यांनी आपली जिवाची पर्वा न करता चालत्या बसमध्ये चढुन ब्रेक दाबून बेकाबु बस थाबविल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस ही बसस्थानकावर उभी होती त्या बस मध्ये चालक वाहक नव्हते. फक्त विद्यार्थी व इतर प्रवासी बसले होते. अचानक बस सुरू झाली कशी.? बस बेकाबू होऊन मोठा अनर्थ करायला निघाली होती. मात्र सुदैवाने काही झाले नाही. बस अचानक सुरू झाली कशी.. काय झाले असावे त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. बस अचानक सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित होत आहे यावर जनमानसात चर्चा सुरु आहे जखमीवर डॉ कुंदन ब्रेद्रे,रेचल वळवी यांनी औषध उपचार केले. बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती.
नवापूर बस स्थानकावरून बस अचानक कशी सुरू झाली याबाबत आम्हालाही मोठा प्रश्न आहे. या घटनेची आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत. घटनेची माहिती आम्ही नवापूर पोलीस ठाण्याला कळवली आहे. सत्य काय ते समोर येईल.
@विजय पाटील डेपो मॅनेजर नवापूर