आपल्या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्या सोबत आपल्या कामात कार्यतत्परता दाखवून समाज मनावर छाप उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला त्यात ८ मार्च २०२५ रोजी नवापूर येथील श्रीमती एस एम चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी तर्फे नंदुरबार जिल्हा परिषदेतील औषध निर्माण अधिकारी सौ. स्नेहल हिमांशू पाटील यांना मिराकी नारी गौरव २०२५ ने सन्मानित करून गौरविण्यात आले. यावेळी माजी महिला बालकल्याण सभापती संगिता गावीत, वनक्षेञपाल स्नेहल अवसरमल,स्नेहलता शहा,संस्थेचे कार्यध्यक्ष शितलबेन वाणी,डॉ तेजल चोखा वाला,शेपाली गांधी, रिना शहा, अनिताबेन अग्रवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ भारती बेलन, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सिमरन अमोल दिवटे आदी उपस्थित होते. विशेष उल्लेखनीय कार्या ची दखल घेत मिळालेल्या सन्मानाबद्दल औषध निर्माण अधिकारी सौ.स्नेहल हिमांशू पाटील यांचे समाज बांधव, नातेवाईक, अधिकारी, यासह आधी क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.