जीर्ण लिंबाच्या वृक्षाची फांदी एका दुचाकी स्वाराचा अंगावर पडली..
शाळेचा परीसरात मोठे जीर्ण वृक्ष तोडण्याची मागणी,भविष्यात धोका..!
प्रतिनिधी---
सार्वजनिक हायस्कूल जवळील लिंबाचा जीर्ण वृक्षाची फांदी दुचाकी स्वार युवकाचा अंगावर पडल्याने युवक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने फांदी डोक्यावर पडली असती तर जीवितहानी होण्याची शक्यता होती. जीर्ण वृक्ष रस्त्यावर तुटून पडल्याची माहीत होताच जवळचे दुकानदार व युवकांनी वृक्षाची फांदी बाजुला सरकवून युवकाला बाहेर काढले त्यात दुचाकी चे नुकसान झाल्याचे आढळले. सार्वजनिक हायस्कूल जवळ दहावीचा पेपर असतांना अनेक पालक शाळे जवळ मार्च हीटचा तडाखा पाहता वृक्षांचा छायेत उभे असतात. त्यात दररोज शाळकरी विद्यार्थी, नागरीक अवजड वाहने, चारचाकी,दुचाकी, आदींची नेहमी वर्दळ असल्याने जीर्ण वृक्ष ताबडतोब काढण्याची मागणी परीसरातील दुकानदार व नागरीकांनी केली. सार्वजनिक हायस्कूल चा महिला वस्तिगृहाला लागुन असलेला जीर्ण लिंबाचा वृक्ष संपूर्णपणे जीर्ण झाल्याने नगरपरिषदेने काढणे आवश्यक आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक हायस्कूल चा गेट क्रमांक 2 येथे वीज तारा वृक्षाचा फांदीत लोबकळत वीज तारांना धोका निर्माण होईल तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचा तसेच पायी नागरीकांचा धोका निर्माण होणार असल्याचे स्थानिक नागरीकांनी सांगितले. जीर्ण वृक्षाला मुळासकट काढणे तसेच सार्वजनिक हायस्कूल चा गेट क्रमांक 2 जवळील फांद्या कापून भविष्यातील धोका वाचविणे सूज्ञ नागरीकांचे, प्रशासनाचे कर्तव्य आहे. अत्यंत जीर्ण वृक्षांमुळे शाळकरी विद्यार्थी, पायी चाल असणारे नागरीक, लहान मुले, जेष्ठ नागरिक, दुचाकी, चारचाकी गाड्या,आदींचे नुकसानीची व जिवितहानी होणार असल्याने लवकरात लवकर जीर्ण वृक्ष काढण्याची प्रमुख मागणी प्रवासी, नागरीकांनी केली आहे