नवापूरचे नरेंद्र नगराळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2025 चा भिमरत्न पुरस्कार प्रधान.. भव्य कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण...
नवापूर-प्रतिनिधी
तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांचे तर्फे
माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवापूर न.पा.चे विरोधी पक्ष नेता नरेंद्र नगराळे यांना त्यांचे कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2025 चा भिमरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. नुकताच पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील तमाम आंबेडकरी चळवळीत तील तसेच धुळे,शिरपूर,सुरत,इतर जिल्ह्यातील मान्यवर यांच्या उपस्थितीत पुरस्कार नरेंद्र देविदास नगराळे यांना भव्य कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी सोबत नवापूर येथील निवृत्त नायब मिलिंद निकम, सेवा निवृत्त भटू पवार,राष्ट्रवादी नवापूर शहर अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मनोहर नगराळे,प्रा.सुनील बोरसे,रमेश पानपाटील,नानाभाऊ साळवे, सीताराम साळवे,बौद्धाचार्य दिलीप धिवरे, सुनील वाघ,पेप्सी अहिरे,सामाजिक कार्यकर्ते,सावरे,कैलास शिरसाठ,हेमंत नगराळे, इतर सामाजिक कार्यकर्ते,व मित्र यांनी त्याचे वैयक्तिक स्वागत व शाल फुल गुच्छ देऊन अभिनंदन केले.