नवापूर --शहरातील रंगावली नदीवरील ब्रिटिश काळातील पीडब्ल्यूडी ब्रिज ची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून, या पार्श्वभूमीवर आज दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस फैज़ल इब्राहिम शेख यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांची आणि सार्वजनिक बांधकाम विभागा नंदूरबारचे कार्यकारी अभियंता (पीडब्ल्यूडी) अंकुश पालवे यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली.
यावेळी फैज़ल शेख यांनी लिमडावाडी रिक्षा असोसिएशन, नवापूर यांच्याकडून प्राप्त झालेली तक्रार प्रत संबंधित अधिकाऱ्यांना सादर केली. या तक्रारीत ब्रिजच्या जीर्ण अवस्थेमुळे रिक्षाचालक व सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या अडचणींचा तपशील दिला आहे, जसे की:पुलावरील मोठे खड्डे व उखडलेला डांबर भिंतींमध्ये तडे व कमकुवत संरचना,अपुरी प्रकाश व्यवस्था, विशेषतः रात्रीच्या वेळी दररोज पायदळ ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थी, वृद्ध व महिलांना मोठा धोका,अपघाताच्या घटना व सततचे आर्थिक नुकसान या संदर्भात अंकुश पालवे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की सद्यस्थितीत तातडीच्या दुरुस्तीचे काम त्वरीत सुरू करण्यात येईल. यासोबतच, २०१८ साली तयार करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालाचा पुनरावलोकन करण्यात येईल. त्या अहवालाच्या आधारे आवश्यक निर्णय घेऊन भविष्यात या पुलाच्या समांतर नवीन पूल उभारण्याच्या दिशेने निश्चित कार्यवाही करण्यात येईल. हरीश भामरे (निवासी उपविभागीय अधिकारी, नंदुरबार) यांनी देखील या विषयाला गांभीर्याने घेतले असून प्रशासन आपल्या पातळीवरून लवकरात लवकर निर्णय घेईल असे सांगितले.