बोधगया स्थित महाबोधी महाविहार त्वरित मुक्ती तथा निरस्त करणे बाबत भिम अनुयायी तथा बौध्द अनुयायीचे निवेदन..!
बोधगया स्थित महाबोधी महाविहार त्वरित मुक्ती तथा निरस्त करणे बाबतचे निवेदन भिम अनुयायी तथा बौध्द अनुयायी नवापूर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तहसिलदार दत्ताञय जाधव यांच्या मार्फत दिले आहे
त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की बोधगया येथे असलेली महा बोधी मठाच्या / विहाराच्या व्यवस्थापन कायदा १९४९ मध्ये तात्काळ निरस्त करुन महाबोधी मठाचे संपुर्ण व्यवस्थापन बौध्द धर्माचे भंते यांचे हातात देण्यात यावे.बोधगया येथील महाबोधी महाविहारांमध्ये सुरु असलेल्या महाबोधी विहार मुक्ती
आंदोलनाच्या सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्यात.जगभरातील आणि देशातील तमाम बौध्द बंधू भगिनींच्या भावना लक्षात घेत आणि त्यांचा आदर करुन १९४९ चा व्यवस्थापन कायदा मध्ये सुधारणा करण्यात यावी.आगामी काळात यासंदर्भात आंदोलने व निदर्शने केले जाणार आहेत याची आपण दक्षता घ्यावी ही विनंती असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर सामाजिक कार्यकरता उमेश पवार,अँड राहुल शिरसाठ,कुणाल नरभवन,विवेक वाघ,गोरखक नगराळे,अजय चव्हाण,सुमित पवार,सनी सावरे,गौतम सिकलगर,विरसिंग कोकणी,अक्षय गावीत,हर्षल साळवे,मयुर साळवे,समाधान खैरणार,राहुल नगराळे यांच्या सह्या आहेत