गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होताच आमदार शिरीषकुमा नाईक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले...!
आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सर्व नियोजित दौरे रद्द करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पालकमंत्र्यांशी करणार चर्चा..!
आमदार शिरीष कुमार नाईक यांची प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे कळताच नवापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सर्व नियोजित दौरे रद्द करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
आष्टे ता. नंदुरबार झालेला अवकाळी पावसाने नवापूर मतदारसंघातील आष्टे गटातील ठाणेपाडा गंगापूर व परिसरात कांदा सह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. घरांचे पत्रे उडाले.नुकसानग्रस्त शेतात नवापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली... व झालेल्या नुकसानीबाबत कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याची विनंती करणार आहे. नवापूर मतदारसंघातील ठाणेपाडा, गंगापूर ,शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने अक्षरशः झोडपून काढले. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या मनलहरी पणाने हिरावून घेतला.. कांदे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यासोबतच आंबा फळाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. तहसीलदार नंदुरबार यांना सदर नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याचे आदेश देत संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले माजी जि प सदस्य देवमन पवार, नवापूरचे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित भरत साबळे. नारायण ढोडरे. सागर पवार. ग्रामपंचायत सदस्य गोकुळदास ठाकरे रोहित पवार. यांच्या सह. शेतकरी उपस्थित होते..