गायन विषयांतील (मध्यमा पूर्ण) या पाचव्या परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल चेतन खैरनार याच्या गौरव..
नरेंद्र खैरनार सुरत यांचा पुतण्या व नवापूर येथील पत्रकार प्रकाश यशवंत खैरनार व प्रा.कविता पी.खैरनार यांचा सुपुत्र चेतन प्रकाश खैरनार याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय संचलित सूररत्न संगीत महाविद्यालय नवापूर येथील केंद्रावर गायन विषयांतील (मध्यमा पूर्ण) या पाचव्या परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल चि.चेतन खैरनार याचे नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शितल वाणी, उपाध्यक्ष शिरिष शाह, संचालक हेमंत शाह विद्यालयाच्या संचालिका रत्ना रामोळे, शिक्षक भानुदास रामोळे यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देउन गौरव करण्यात आला.
चि.चेतनचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्राप्त होत आहेत.