नगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक गणवेशाचे वाटप
April 02, 2025
0
नवापूर नगर पालिकेत नवनियुक्त मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या हस्ते अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक गणवेशाचे वाटप करण्यात आले.नवापूर नगर परिषद क्षेत्र तसेच इतर जवळील भागात कायम दक्षतेने अग्नी विरोधी सेवा देण्यास उपलब्ध असलेल्या नगरपरिषद अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना या गणवेशाचा अधिकच उत्तम सेवा देण्याकरिता उपयोग होईल.गणवेश वाटप वेळी अग्निशामन विभाग प्रमुख प्रसाद सानप ,लिपिक संजय शिरसाठ,प्रथमेश मराठे,राकेश गावितअग्निशमन वाहन चालक राजेश गावित सलीम पठाण फायर फायटर अल्पेश गावित कैलास गावित संतोष वाघ भास्कर भालेराव मयूर साळवे आदी उपस्थित होते .सदर गणवेश महाराष्ट्र राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांना पुरविण्यात आले होते त्यापैकी सहा गणवेश नवापूर नगर परिषदेस प्राप्त झाले होते.