नवापूर शहरात पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांच्या श्रद्धांजलीसाठी जमीयत उलेमा-ए-हिंद, नवापूरच्या नेतृत्वाखाली एक शांततामय कॅंडल मार्च आयोजित करण्यात आला.
कॅंडल मार्च सायंकाळी ७:१५ वाजता गांधी पुतळा चौक येथून सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत शांततेने पार पडला. या मार्चमध्ये सर्व समाज, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, धार्मिक संस्था, युवक संघटना आणि हजारोंच्या संख्येने सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सर्व उपस्थितांनी हातात मेणबत्त्या, प्लेकार्ड्स आणि फलक घेऊन अतिरेकी कृत्याचा निषेध केला आणि देशात शांतता, एकोपा व मानवतेचा संदेश दिला.
कॅण्डल मार्चच्या समारोपस्थळी तहसीलदार कार्यालय येथे तहसिलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. त्या नंतर पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करत शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“एक निर्दोषाचा खून म्हणजे संपूर्ण मानवतेचा खून आहे” या कुरआनी शिकवणीवर आधारित संदेशाने सर्व धर्म, समाज आणि पंथांनी एकत्र येऊन एकता, शांती व मानवतेची जागृती घडवून आणली.