नाशिक विभागाचे आमदार सत्यजित सुधीर तांबे यांची नवापूरला भेट, संस्थाचालकांसह शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.. संस्थाचालकांनी दिले निवेदन..!
@ समाजकल्याण विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या वस्तीगृहातील अनुदानाच्या प्रश्न बाबत पाठपुरावा करणार-आमदार सत्यजित तांबे यांची ग्वाही..!!
नाशिक विभागाचे आमदार सत्यजित सुधीर तांबे नवापूर शहरात सदिच्छा भेट दिली यावेळी नवापूर शहरातील विश्रामगृह येथे त्यांची आगमन झाले. यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक यांनी सुधीर तांबे यांचे स्वागत केले. नवापूर शहर व तालुक्यातील संस्थाचालक व संचालक, शिक्षक यांनी आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. यावेळी नवापूर शहरातील विविध शाळांचे प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक उपस्थित होते. यावेळी संस्थाचालकांनी समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वस्तीगृहाच्या अनुदाना चा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वस्तीगृहाना कोविड नंतर शासनाने नंदुरबार जिल्ह्यात तसेच नाशिक विभागात तसेच इतर जिल्ह्यात अनुदान दिलेले नाही. त्यामुळे वस्तीगृह चालवणे संस्थाचालकांना कठीण झाले आहे. आदिवासी समाजाचे व इतर समाजाचे मुलं वस्तीगृहाच्या त्या माध्यमातून शिक्षण घेत आहे. त्यामुळे शासनाने या वस्तीगृहांना तातडीने अनुदान दिले पाहिजे. या बाबत मी गंभीरपणे नोंद घेतली असून मंत्रालय व समाज कल्याण विभागाशी तसेच अर्थ विभागाशी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षकांनी आपल्या परीने विविध समस्या आमदार सत्यजित तांबे यांच्यासमोर मांडल्या. यावर आपण पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थाचालकांनी आमदार सत्यजित तांबे यांच्या सत्कार केला तसेच त्यांना निवेदन दिले. यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनीही सत्यजित तांबे यांच्यासोबत शिक्षण विभागातील विविध प्रश्न व शिक्षकांच्या समस्या मांडल्या. तसेच विविध विषयांवर त्यांनी चर्चाही केली. यावेळी संस्थाचालक आरिफ बलेसरीया, हरीश प्रताप पाटील, अजय पाटील,पंचायत समिती सदस्य राजेश गावित, राजेंद्र अग्रवाल, प्राचार्य संजयकुमार जाधव, आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील, वनिता विद्यालयाचे पर्यवेक्षक चंद्रशेखर बेंद्रे, सार्वजनिक हायस्कूलचे उपमुख्याध्यापक नारायण मराठे आदी उपस्थित होते.