विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नवापूर प्रखंडाच्या वतीने हाताला काळी फीत बांधून आणि “पाकिस्तान मुर्दाबाद”च्या घोषणा देत पदयात्रा करत तहसीलदारांना दिले निवेदन
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नवापूर प्रखंडाच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले. श्री गणपती मंदिराजवळ सर्व पदाधिकारी एकत्र आले.हाताला काळी फीत बांधून आणि “पाकिस्तान मुर्दाबाद”च्या घोषणा देत सराफ गल्ली, शिवाजी रोड, लाईट बाजारमार्गे पदयात्रा करत तहसील कार्यालयात दाखल झाले. पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेला पर्यटकांवरील हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या हल्ल्यात २७ पेक्षा अधिक पर्यटक मृत्युमुखी पडले असून अनेक जखमी झाले आहेत. अशा संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. केंद्र शासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी प्रखंड मंत्री दर्शन दिपक पाटील,महेश अनिंदा वारुडे,शामराव नारायण गावित शंकर जगदिश दर्जी,विजय मोतिराम बागुल अनिल मंजी वळवी,सेवानिवृत पोलिस निरीक्षक अजय वसावे, राजू गावित,सेवा निवृत पोलिस निरीक्षक तथा भाजपा नेते अजय वसावे, सत्यपाल गावीत ,मौल्या गावीत, कमलेश छत्रीवाला अनिल सोनार, माजी नगरसेवक महेंद्र दुसाने ,आबा मोरे किरण टिभे, राहुल दुसाने ,अजय अग्रवाल, रितेश दर्जी व नवापूर शहरातील नागरिक उपस्थित होते. निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणे,पो हे का विनोद पराडके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता