नवापूर प्रतिनिधी
नवापूर शहरात आगीचे प्रमाण वाढले असून नगरपालिका कार्यालयासमोरील डीपी जळाली, त्यानंतर धडधड्या भागातील किराणा दुकानाला आग लागली, व आता कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील मुतारी जळाल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहे. काही महिन्यापूर्वी इंदिरानगर येथील महिलेचे घर आगीत जळून भस्मसात झाले होते.
नवापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या सार्वजनिक शौचालयाला आज अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे बाजार समिती परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी आणि व्यापारी भयभीत झाले होते. आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आज दुपारी अचानक शौचालयातून धूर आणि आगीच्या ज्वाला येत असल्याचे पाहून लोकांनी आरडाओरड सुरू केली. घटनेची माहिती मिळताच नवापूर नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. वाढलेल्या तापमानामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती तपासानंतरच समोर येईल, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी कैलास गावीत, अल्पेश गावीत, भास्कर भालेराव आणि सलिम पठाण यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांनीही अग्रिशाम बंम तातकाळ कळविल्याने पुढील अन्थ टळला आहे. परिसरातील नागरीकांनी एक गर्दी केली होती या आगीमुळे शौचालयाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही:::::.