अभियांत्रिकी शाखांना अहिराणी अभ्यासक्रमात प्रा. बी.पी. राजपूत लिखित खानदेशातील एकमेव पहिला अहिराणी एकांकिका संग्रह राम राम भावड्या या अहिराणी साहित्याला मानाचे स्थान प्राप्त
@ नागलवाडी येथे शिरपूरचे रहिवासी प्रा.बी.पी राजपूत यांच्या भव्य सत्कार
कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या अंतर्गत महाविद्यालयातील अभियांत्रिकी (Engineering) शाखांना अहिराणी अभ्यासक्रमात प्रा. बी.पी. राजपूत लिखित खानदेशातील एकमेव पहिला अहिराणी एकांकिका संग्रह राम राम भावड्या या अहिराणी साहित्याला मानाचे स्थान प्राप्त झाल्याबद्दल प्रा.बी.पी. राजपूत सरांचा समस्त राजपूत समाज नागलवाडी व तसेच श्री धर्मदास नगरसिंह राजपूत व परिवार यांच्याकडून सत्कार समारंभ नागलवाडी येथे पार पडला. यावेळी माध्यमिक विद्यालय नागलवाडी चे मुख्याध्यापक आर. बी. पाटील, माजी सरपंच गोपाल गबा पाटील, विकास सोसायटी चेअरमन राजू शिवलाल पाटील तसेच महाराणा प्रताप पतपेढी लिमिटेड नागलवाडीचे चेअरमन राजेंद्र रामसिंग पाटील, नितीन राजपूत, जितेंद्र चौधरी, प्रगतिशील शेतकरी संदीप जि. प. केंद्र शाळा भडगाव चे मुख्याध्यापक ईश्वर पाटील,मेहुल राजपूत, नागलवाडी गावातील सरपंच उपसरपंच,ग्रामस्थ व माता-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी नगराध्यक्ष प्रकाश मोहन पाटील यांनी भूषविले तसेच दीपक राजपूत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत प्रा.कल्याणी राजपूत यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद राजपूत यांनी केले.
जळगाव नवीन राष्ट्रीय शैक्षणिक
धोरणानुसार (एनईपी २०२०), भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून आणि स्थानिक भाषेतून शिक्षण घेण्यासाठी सूचित करण्यात आलेले आहे. कला महाविद्यालय आणि विद्यापीठात खान्देशातील एक प्रमुख बोलीभाषा अहिराणी अभ्यासक्रमात असणे स्वाभाविक आहे, परंतु एका वेगळ्या वाटेने जाऊन जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अहिराणीचा अभ्यासक्रम अभियंता बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे.