अधिकारी व कर्मचाऱ्यांरी म्हणाले की मी प्रतिज्ञा करतो की..
नवापूर (प्रतिनिधी):
नवापूर नगरपालिकेत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हात पुढे करून प्रतिज्ञा घेतली.
प्रतिज्ञेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, "आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करू."
या वेळी नवापूर नगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते