ग्राहक पंचायत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बिंदू माधव जोशी यांची पुण्यतिथी साजरी
नवापूर (प्रतिनिधी ) अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बिंदूमाधव जोशी यांच्या पुण्यतिथी निमित त्यांच्या प्रतिमेचे पुजन ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य मंगेश येवले यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा गांधी वाचनालयात संपन्न झालेल्या कार्यकमात मंगेश येवले यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. देशभरातीत ग्राहकांना संघटीत करण्याच्या उद्देशाने १९७४ मध्ये ५ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ग्राहक पंचायतीची मुहूर्तमेढ करून सर्वसामान्य ग्राहकांना त्यांचे हक्क मिळवून देणारी चळवळ आज देशभरात फोफावली आहे. जोशी यांच्या अथक परिश्रमामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये संमत करण्यात आला.. या कार्यकम प्रसंगी विजय चव्हाण, नंदलाल शांतू गावीत, विजय मोतिराम बागुल, दिनेश देवजी मावची, ग्राहक पंचायत चे नवापूर उपाध्यक्ष हेमंत पाटील, वाघ्या रुवाजी गावीत, सोमला पोसल्या गावीत रमेश बापू मावची ग्रंथालय सेवक मुकेश सांगळे आदी उपस्थित होते