प्रलंबित मागांसाठी कृषि सहाय्यकांचे धरणे आंदोलन
नवापूर | ७ मे
राज्यभरातील कृषि सहाय्यकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची धार तीव्र केली आहे. १५ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यातील कृषि सहाय्यकांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात धरणे आंदोलन करून आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष टी. के. वळवी तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषि सहाय्यकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
कृषी सेवक कालावधी रद्द करणे व थेट नियमित कृषि सहाय्यक पदावर नियुक्ती देणे.
पदनाम बदल करून 'कृषी सहाय्यक' ऐवजी 'सहाय्यक कृषी अधिकारी' असा दर्जा देणे.
. सर्व कामकाज डिजिटल होत असल्याने लॅपटॉपची सुविधा देणे.
ग्रामस्तरावर कार्य करताना तलाठी वा ग्रामसेवकासारखा एक मदतनीस उपलब्ध करून देणे.
निविष्ठा वाटप प्रक्रियेत सुसूत्रता आणणे आणि वाहतूक भाड्याची तरतूद करणे.
. कृषी विभागाच्या आकृती बंधास तत्काळ मंजुरी देणे.
कृषी सहाय्यकांचे म्हणणे आहे की, अनेक वेळा निवेदन देऊनही सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.