प्रथमच भूमिपुत्राची प्राचार्यपदी नियुक्ती...!
नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाच्या प्राध्यापक डॉ. दीपक जयस्वाल यांनी पदभार स्वीकारला, अभिनंदन व शुभेच्छांच्या वर्षाव..!
पदभार स्वीकारल्यावर महाविद्यालयाच्या परिसरात 51 रोपांची केली लागवड, वृक्ष संवर्धनाच्या केला संकल्प.
पदभार स्वीकारल्यावर महाविद्यालयाच्या परिसरात 51 रोपांची केली लागवड, वृक्ष संवर्धनाच्या केला संकल्प..!
पदभार स्वीकारल्यावर महाविद्यालयाच्या परिसरात 51 रोपांची केली लागवड, वृक्ष संवर्धनाच्या केला संकल्प..!
नवापूर प्रतिनिधी
नवापूर येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्राध्यापक डॉ दीपक जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज प्राचार्य पदाच्या पदभार डॉ. ए जी जयस्वाल यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी संस्थेचे सचिव तानाजीराव वळवी,उपाध्यक्ष हरीश अग्रवाल, कोषाध्यक्ष आरिफ बलेसरिया, सहसचिव अजित नाईक, सहसचिव अजय पाटील, संचालक दीपक वसावे, सेवानिवृत्त प्राध्यापक आर डी पाटील आदी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल यांनी नवागाव येथे जाऊन संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री सुरूपसिग नाईक व धीमीबाई नाईक त्यानंतर नवापूर येथे आमदार तथा संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष कुमार नाईक यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. व आभार मानले.पदभार स्वीकारल्यानंतर प्राचार्य दीपक जयस्वाल यांनी महाविद्यालयाच्या परिसरात 51 रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतल्याचे यावेळी सांगितले. प्रसंगी शैक्षणिक गुणवत्ता त्याचप्रमाणे विद्यार्थी व संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.दीपक जयस्वाल हे 11 ऑगस्ट 1999 साली प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात रुजू झाले. 33 वर्ष अध्यापन कार्य त्यांनी केले, या काळात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम ही राबवले. एम एस सी एचडी प्राणिशास्त्र विभाग प्रमुख पदी असताना एम एस सी विषयाची सुरुवात केली. शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे.
उत्कृष्ट संशोधक तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कृत कोरोना योद्ध पुरस्काराने त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत विविध रोग निदान शिबिराचे आयोजन करून त्यासोबतच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तगट तपासणी शिबिर ही त्यांनी घेतली आहेत नवनियुक्त प्राचार्य दीपक जयस्वाल यांनी आतापर्यंत 70 वेळा रक्तदान केले आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांना ते वेळोवेळी रक्तदान करत असतात. त्यामुळे त्यांना रक्तकर्ण म्हणून ही संबोधले जाते.वृक्षारोपण व रक्तदान या कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, मित्रपरिवार तसेच समाज बांधव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.