बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी पुण्यतिथी निमित्त महात्मा बसवेश्वर नगरात आरती व प्रसाद वाटप
नंदुरबार ( प्रतिनिधी) शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर भागात मंगळवार दि. 20 मे रोजी सायंकाळी वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे परमपूज्य बालब्रह्मचारी संतश्री सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी नंदुरबार येथील गंगाराम देवर्षी यांच्या हस्ते परमपूज्य सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. संभाजी हिरणवाळे यांनी उपस्थित भाविकांच्या कपाळावर इबित (भस्म) लावले. शंखनाद करूनआरतीला सुरुवात झाली. महारतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
≠=======================
चौकट
गुरुवर्य सिदाजी आप्पा देवर्षी यांच्याबाबत पत्रकार महादू हिरणवाळे यांनी माहिती देताना सांगितले कि, परमपूज्य सिदाजी आप्पा यांचा जन्म 1882 मध्ये झाला. तर त्यांचे देहावसन अर्थात स्वर्गवास 20 मे 1967 रोजी झाले. सिदाजी आप्पांनी लिंगायत गवळी समाजात गावोगावी जाऊन समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे. कर्नाटक राज्यातील चीडगोपा आणि महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील सावरगाव येथे मठ आहे. प्रतिवर्षी श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तेलंगणा राज्यातील गवळी समाज बांधव दर्शनासाठी हजेरी लावतात. याशिवाय नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे देखील परमपूज्य सिदाजी अप्पा देवर्षी यांचे काही वर्षे वास्तव्य होते.
महादू हिरणवाळे, नंदुरबार
========================
बालवीर चौकात आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी महादू हिरणवाळे, संभाजी हिरणवाळे, राजू शहापूरकर, सदाशिव हिरणवाळे, सुदाम हिरणवाळे, राजेश बारसे, काशिनाथ हिरणवाळे, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.