लोकशाही दिनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मौजे वाकीपाडा ता. नवापूर येथील जीर्ण पुलाची चौकशी करणेबाबत तक्रारी अर्ज--
तक्रारी अर्जावर चर्चा होऊन पुढील उचित कार्यवाही कामी प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, धुळे यांना पाठविण्याच्या सूचना
नवापूर प्रतिनिधी--
सहा.जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचेकडील परिपत्रक क्रमांक/आस्था कावि/335/2024 दि.01.04.2025 अन्वये नवापूर तालुक्यात तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येत आहे. तहसिल कार्यालय, नवापूर येथे सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार यांचे उपस्थितीत तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. सदरच्या लोकशाही दिनास तालुक्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.लोकशाही दिनाच्या सुरुवातीस सर्व उपस्थितांचे स्वागत करुन लोकशाही दिनास सुरुवात करण्यात आली. सर्व प्रथम मागील लोकशाही दिनाच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात येऊन प्राप्त तक्रारींबाबत माहिती घेण्यात आली. मंगेश येवले यांची नगरपरिषद, नवापूर येथील घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारावर कारवाई करणेकामी प्राप्त तक्रारीबाबत लेखी उत्तर न मिळाल्याने तक्रारदार यांना तात्काळ तक्रारीच्या अनुषंगाने लेखी उत्तर देणेबाबत मुख्याधिकारी, नवापूर यांना सांगण्यात आले. मंगेश येवले यांनी लोकशाही दिनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मौजे वाकीपाडा ता. नवापूर येथील जीर्ण पुलाची चौकशी करणेबाबत तक्रारी अर्ज सादर केला. सदरच्या तक्रारी अर्जावर चर्चा होऊन पुढील उचित कार्यवाही कामी प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, धुळे यांना पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मंगेश येवले यांनी वैद्यमापन शास्त्र विभाग,नंदुरबार यांनी नवापूर येथील ध्रुव वे ब्रिजचे पडताळणी संदर्भात तक्रार अर्ज सादर केला. सदरचा तक्रार अर्ज संबंधीत विभागास कार्यवाहीकामी पाठविणेबाबत सूचना देण्यात आल्या. उपस्थितां पैकी कुणाची तक्रार नसल्याने तसेच मागील लोकशाही दिनातील तक्रारीबाबत निरसन केल्याने सर्व उपस्थितांचे आभार मानून तालुकास्तरीय लोकशाही दिन संपन्न करण्यात आला.