नवापुर शहरातील श्री पवनपुत्र हनुमान गृप तर्फे गुजरात राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पवित्र तिर्थस्थळ सारंगपूर येथील श्री कष्टभंजन हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी लग्झरी बसने धार्मिक तीर्थ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात अशी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सारंगपूर येथे भारतातून भाविक मोठ्या संखेने जात असतात.तीर्थ यात्रेत श्री पवनपुत्र हनुमान ग्रुपचे राजू गावित,भागवत चौधरी,महेश वारुडे,कल्पेश धोडिया,नितीन लोहार,निमेश प्रजापत,मितेश नायका,प्रितेश यादव,प्रकाश नायका यांच्यासह शहरातील सर्व लहान मोठे बजरंगी श्री हनुमान चालीसा पठण करीत रवाने झालेत.नवापूर येथील श्री पवनपुत्र हनुमान गृप तर्फे सारंगपूर दर्शनासाठी रात्री बडौदा येथे मुळचे नवापुर येथील जिग्नेश जाधव यांच्या परिवाराणे रात्री 1,30 वा बड़ौदा येथील मुंबई अहमदाबाद हायवेवर येउन तिर्थयात्रा मध्ये सहभागी झालेल्या 60 भाविकांन जेवु घातले,अगदी सर्वच तीर्थ यात्रेकरूना सेंडविच, वेफर्स, बिस्किट,थंडपेय खाऊ पिऊ खालुन सर्वांनी आनंद लुटला,मध्य रात्री सहकार्य केल्या बद्दल पवनपुत्र हनुमान गृप नवापुर तर्फे जिग्नेश जाधव यांच्या परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले.सारंगपूर येथून श्री कष्टभंजन हनुमान दादांची तीन फुट उंचीची मूर्ती घेवून मंदिर ट्रस्टचे पूज्य स्वामीजी यांच्या हस्ते श्री कष्टभंजन हनुमान दादांची मूर्तीची पूजा आरती करून नवापूर येथे आणाली आहे.*
आता यापुढे प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या हनुमान चालीसा पठन कार्यक्रमात नविन आणलेली श्री कष्टभंजन हनुमान दादांची मूर्ती सोबत घेवून हनुमान चालीसा पठन करण्यात येयील.नवापूर येथील श्री पवनपुत्र हनुमान गृप तर्फे गेल्या दोन वर्ष्यापासून नवापूर शहरात सामाजिक कार्यकर्ते भागवत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दर शनिवारी हनुमान चालीसा पठन कार्याक्रमचे शिस्तबद्ध आयोजन करण्यात येत असते तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने आमंत्रित केलेल्या स्थळी सुद्धा हनुमान चालीसा पठन कार्याक्रम करीत असतो.आतापर्यंत ठिकठिकाणी जावून ११० हनुमान चालीसा पठण करण्यात आले आहे.असल्याची माहिती श्री पवनपुत्र हनुमान गृपचे भागवत चौधरी यांनी दिली.