अवैधरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काळया बाजारात विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..!!
@ 3 ट्रकांसह तब्बल 53 लाख 76 हजार 630 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत..!
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर येथून ट्रक क्रमांक MH 23 AU 9900, ट्रक क्रमांक MH 18 BG 1911 तसेच ट्रक क्रमांक MH 20 EL 9692 यांचेत रेशनिंगचे तांदुळ गोणपाट मधुन काढुन घेऊन ते पांढऱ्या गोणीत भरुन विसरवाडी मार्गे गुजरात राज्यात काळया बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत, बाबत खात्रिशिर माहितीवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास कारवाईकामी रवाना केले.मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील विसरवाडी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोलपंप समोर रोडावर योग्य सापळा रचला असता तिनही
ट्रक काही वेळाचे अंतराने आले असता त्यांना थांबविण्यात आले व त्यावरील वाहन चालकांना त्यांची नावे गावे विचारता ट्रक क्रमांक MH 23 AU 9900 वरील चालक नामे अमोल प्रल्हाद गिरे, वय - 30 वर्षे, रा. डोयफळ वाडी, ता. गेवराई, जि. बीड, 2) ट्रक क्रमांक MH 18 BG 1911 वरील चालक नामे रावसाहेब फकीरराव दिघोळे, वय- 27 वर्षे, रा. निंभोरा पोस्ट कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर तसेच 3 ) ट्रक क्रमांक MH 20 EL 9692 वरील चालक नामे सचिन बाळासाहेब पवार, वय- 30 वर्षे, रा. खातखेडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. त्यांना ट्रकमध्ये काय माल आहे बाबत विचारणा करता ट्रक क्रमांक MH 23 AU 9900 हिचेत अजिंठा येथुन मितेश गांधी, रा. नागपुर यांचा तांदुळचा माल असुन ट्रक क्रमांक MH 18 BG 1911 व MH 20 EL 9692 यांच्यातील तांदुळ हा ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक वसिम, रा. छत्रपती संभाजीनगर यांचा असुन तिनही ट्रकमधील माल हा गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांना सदर घेऊन जात असलेल्या तांदुळाचे मालाचे वैध पावात्यांबाबत विचारता त्यांचेकडे वैध पावत्या नसल्याचे दिसुन आले. तसेच पथकाने ट्रकांमधील मालाची तपासणी करता त्यात विविध रंगाच्या तांदुळ भरलेल्या गोण्या मिळुन आल्या गोण्यांवर कोणत्याही कंपनीचे लेबल नव्हते तसेच गोण्यांमधील तांदुळची पाहणी करता तो साठवणुक केलेला रेशनचा जुना तांदुळ असल्याचे मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे दिसुन आले. त्याअन्वये नमुद तिनही इसमांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ताब्यात घेतले. सदर तिनही ट्रकमधुन एकुण 856 क्विंटल रेशनचा तांदुळ व वाहन असे मिळुन 53,76,630/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. त्याअन्वये आरोपींविरुध्द विसरवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.- 150/2025 जिवनाश्यक वस्तु अधि. 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोहेकॉ / राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, बापु बागुल, पोना/जितेंद्र तोरवणे, पोकॉ, राजेंद्र कटके अशांनी केली आहे.