@ गुजरात महाराष्ट्र सीमेवरील महामार्गालगत वन्यप्राण्यांचा वावर वाढला; सुरक्षा उपाययोजनांची गरज..!!
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील माचाहोंडा शिवारात आज, गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महामार्ग ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्या जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती मिळताच, चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी आणि वन कर्मचारी रामदास पावरा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन विसरवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवला. पशुवैद्यकीय डॉक्टर हर्षल पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.
राष्ट्रीय महामार्गांवर वन्यजीवांचे अपघात वाढल्याने, त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
विसरवाडी नजीक राष्ट्रीय महामार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे गुजरात महाराष्ट्र सीमेलगत महामार्गालगत वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे यावर सुरक्षा उपाययोजनांची गरज आहे.धुळे-सुरत महामार्गावर वन्यजीवांसाठी धोका वाढत असल्याचे बोलले जात आहे.जंगल सोडून मानवी वस्तीकडे वळणारा बिबट्या मृत्यूमुखी पडल्याने वनविभाग अलर्ट झाल्याचे बोलले जात आहे.