मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स या शाखेत ९३% गुणांसह प्रथम श्रेणीने उत्तीर्ण
नवापूर (प्रतिनिधी) – नवापूर येथील वनिता विद्यालयाचे कर्मचारी प्रकाश सैदाणे यांचे सुपुत्र कुलदीप प्रकाश सैदाणे याने अमेरिकेतील प्रख्यात Pace University येथून मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स या शाखेत ९३% गुणांसह प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होत अभिमानास्पद यश संपादन केले आहे.
कुलदीपच्या या यशामुळे नवापूर तालुक्याचे नाव जागतिक स्तरावर उजळले असून, सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुलदीपने कठोर मेहनत, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
त्याच्या या यशामागे वडील प्रकाश सैदाणे यांचे अपार कष्ट आणि त्यांची दूरदृष्टी असलेल्या शैक्षणिक दृष्टिकोनाचे मोठे योगदान आहे. आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी जीवाचे रान करून प्रयत्न केले. अमेरिकेसारख्या देशात शिक्षणाची सोय करून दिली आणि आज कुलदीपने त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. कुलदीप हा वनिता विद्यालय येथील वरिष्ठ लिपिक प्रकाश सैंदाणे यांचे सुपुत्र आहेत.
या यशाबद्दल कुलदीप आणि त्याचे वडील प्रकाश सैदाणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, नवापूर शहरातही आनंदाचे वातावरण आहे. कुलदीपच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे.