🩸 जिल्ह्यात रक्ताची नितांत गरज; नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
नंदुरबार । दिनांक २७ मे २०२५ (जिमाका)
जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात व अन्य वैद्यकीय रक्ताची व रक्तसाठ्याची नितांत गरज भासते, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून रक्तदान करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
त्या आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय कक्षामार्फत आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे स्वतः सर्वप्रथम रक्तदान करून त्यांनी या शिबिराचे उद्घाटन केले व इतरांनाही आवाहन करून रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा,
कृष्णकांत कनवारीया (शहादा),
रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रमा वाडीकर,
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय कक्षाचे डॉ. तुषार धामणे,
तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#रक्तदान_जीवनदान #नंदुरबार #DistrictCollector #SocialAwareness #BloodDonationCamp