नवापूर शहरासह तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले,झाडे उन्मळून नागरीकांचे नूकसान..सोसाट्यांचा वादळी वाऱ्यासह
नवापूर तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.रात्री सात वाजेपासुन नवापूर शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सायंकाळी पाच वाजेपासुन ढगाळ वातावरण निर्माण होत प्रचंड सोसायट्या चा वारा वाहत विजांचा कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.नवापुर शहरात तलाठी कार्यालयाजवळ निंबाचे वृक्ष वीजेचे डिपी वर पडले होते तसेच अनेक ठिकाणी शहरात,गावात,तालूक्यात झाडे पडुन नूकसान झाले आहे.तसेच नवापूर शहरातील गोविंद वेडूभाई नगर येथील याहा पांडोर कणी कन्सरी सत्संग सेवा समिती चे याहा मोगी मंदिर परिसरात झोपडी चे पत्रे पडुन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
आई कुलदेवी याहा मोगी धाम म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध स्थान असून भाविकांचे श्रध्दास्थान आहे.नवापूर तालुक्यात व शहरात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.नवापूर शहरात पावसाळ्यापूर्वी नाले खोलीकरण,साफसफाई न झाल्याने मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी ओसंडून वाहत होते.अत्यंत घाण पाणी गटारीतून येत असतांना नवापूर नगरपालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजलेले दिसते.नाल्याचा घाण पाण्यातूनच दुचाकीस्वार, चारचाकी , पायी चालणारे मार्गक्रमण करत होते.
हवामान विभागाने दिनाक 9 मे 2025 पर्यंत नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता असून नागरीक,जेष्ठ नागरिकांनी सतर्कता राखावी तसेच शेतकरी बांधवांनी धान्याची योग्य निगा राखावी.नंदुरबार जिल्ह्यासह नवापूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत प्रचंड नुकसान करत साथीच्या आजाराला निमंत्रण दिले आहे.