राष्ट्रीय महामार्ग क्र सहा वरील वाकिपाडा पुलावर दुचाकीच्या भीषण अपघात युवक जागीच ठार.. तर दुसरा युवक गंभीर जखमी..
राष्ट्रीय महामार्ग क्र सहा वरील वाकिपाडा पुलावर महामार्ग प्राधिकरण विभागाचा हलगर्जी पणामुळे भीषण अपघात घडल्याची घटना घडली असून युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे
वाहनचालक आशिष अशोक वसावा वय अंदाजित 35 ते40 गुजरात राज्यातील बडोदा येथील रहिवासी असून दुचाकी क्रमांक जी. जे.06 जे. एन.3801 वाहनाने धुळे कडून सुरत कडे जात असताना वाकिपाडा येथील वाहतूक बंद असलेल्या पुलांच्या अलीकडे माती च्या ढीगाऱ्याचा अंदाज न आल्याने दुचाकी हवे मध्ये 10 ते 15 फुटू उंच उडून दुचाकी वर असलेले दोघी रस्त्यावर आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असणारा इसम नयन वढेल राहणार बडोदा हा गंभीर जखमी असून व्यारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे
नवापूर पोलिस आणि 108 चालक लाजरस गावित यांनी रुग्ण वाहकीकेतून सदर इसमाला उपजिल्हारुग्णालय नवापूर येथे आणले होते
नवापूर शहरा पासून काही अंतरावर सुरत धुळे महामार्गावर वाकिपाडा गावा लगत वाहतूक बंद असलेल्या पुलावर महामार्ग प्रशासना कडून वाहतूक बंद चे सूचना फलक असताना त्याच मार्गावर सूचना फलक जवळच वे ब्रीज असल्याने वाहन जाण्यासाठी एकेरी मार्ग काढल्याने हा अपघात घडला आहे ह्या अपघातात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी असो की चौपदरीकरण करत असलेल्या ठेकेदार यांचा हलगर्जी पना उघड झाला आहे
अधिकारी आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षा मुळे एक निर्दोष वाहन चालकाचा मृत्यू झाला असून ह्याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आणि महामार्ग प्रशासन अधिकारी असून ह्याचा वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असे नागरिकां कडून बोलले जात आहे