नवापूर शासकीय विश्रामगृह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत खासदार गोवाल पाडवी यांनी साधला संवाद, घेतली बैठक..
अवकाळी नुकसान आढावा बैठकीसोबत तक्रारींची दखल घेत
संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरूनच समस्या सोडविण्याच्या दिल्या सूचना.
नवापूर प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्याचे खासदार एडवोकेट गोवाल पाडवी यांनी नवापूर तालुक्याच्या दौरा केला. नवापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून बैठक घेतली
नवापूर शासकीय विश्रामगृहावर नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत विविध स्थानिक व प्रशासनाशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यकर्त्यांनी मांडलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत, संबंधित अधिका ऱ्यांना जागेवरूनच समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.
तसेच राष्ट्रीय महामार्गा संदर्भातील अडचणींची माहिती घेत तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधून योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नवापूर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांचा दिवसांनी बाबत गंभीरपणे दखल घेत आढावा बैठक घेतली
ग्रामस्तरावरच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असल्याचे खासदार गोवाल पाडवी यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री एडवोकेट के सी पाडवी काँग्रेसचे दिलीप नाईक, माझी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे, माजी नगरसेवक आरिफ बलेसरिया, काँग्रेस शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया ,हारुण खाटीक, अश्विन वसावे आदी उपस्थित होते. खासदार गोवाल पाडवी यांनी गण व गटाचा दौरा करून समस्या जाणून घेण्याच्या अपेक्षा ग्रामस्थांनी केली आहे. कारण गाव पाड्यावर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.