डॉक्टर विजयकुमार गावित यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार; म्हणाले, आमच्या व्यतिरिक्त एक पुढारी दाखवून द्या ज्यांनी योजना आणून लाभ दिला
नवापूर प्रतिनिधी
नंदुरबार येथे लाभार्थ्यांना शांततेत गृह उपयोगी वस्तूंचे वाटप शांततेत चालू असताना कोणीतरी लोकप्रतिनिधींनी येऊन त्यांचे माथे भडकवणे चूक आहे. आम्ही लोकांसाठी ज्या ज्या वेळी योजना आणल्या त्या त्यावेळी त्या बंद पाडण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना दखल घेण्याचा अधिकार नाही. योजना शासनाच्याच असतात हे खरे आहे परंतु त्या लोकांपर्यंत देण्याची नैतिकता नेत्यांमध्ये असावी लागते. जिल्ह्यामध्ये असा एक पुढारी दाखवून द्या ज्याने नवीन काही योजना आणली आहे आणि लोकांना लाभ दिला आहे; अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज गृहपयोगी वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना विरोधकांना फटकारले.25000 संच वाटप झाले आहेत 25000 संच पुढे वाटप केले जाणार आहेत तरी प्रत्येक लाभार्थ्याला लाभ दिला जाणार असल्यामुळे नाव नोंदणी करून रीतसर आणि शांततेत सर्वांनी लाभ घ्यावा; असे आवाहन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी याप्रसंगी केले